
‘कू’ने नुकताच एशिया पॅसिफिक क्षेत्रातल्या लोकप्रिय 5 उत्पादनांमध्ये स्थान मिळवण्याचा बहुमान पटकावला आहे. ‘ऑम्प्लिटय़ूड’च्या 2021 च्या प्रॉडक्ट रिपोर्टमध्ये हे जाहीर करण्यात आले आहे. ‘कू’ हा हिंदुस्थानातील बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. एपीएसी यूएस आणि ईएमईए क्षेत्रामधून या अहवालात मानांकन मिळवणारा ‘कू’ हा एकमेव सोशल मीडिया ब्रॅन्ड ठरला आहे. हिंदुस्थानातील ब्रॅन्ड्सपैकी दोनच ब्रॅन्ड्सना हा बहुमान मिळाला आहे.



























































