कोपरगाव- रानडुकराचा सोनेवाडी शिवारात धुमाकूळ, शेतकऱ्यांची बंदोबस्ताची मागणी

439

कोपरगाव तालुक्यात असलेल्या सोनेवाडी शेती शिवारात काही दिवसांपासून रानडुक्करांचा धुमाकूळ सुरू आहे. या वन्य प्राण्यामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे वनक्षेत्राला ताराचे कंपाऊंड करावे अथवा या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रा. गीताराम जावळे यांनी केली आहे.

सोयाबीनची पेरणी उतरली नाही, अळी पडल्याने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ऊस शेती व मका पिके सध्या जोमात आहे.पिण्यास पाणी व खाण्यास अन्न मिळत नसल्यामुळे या प्राण्यांनी आपला मोर्चा शेतांकडे वळविला आहे. सोनेवाडी पंचक्रोशीत ऊस शेतीवर हे रानडुक्कर तुटून पडत असून ऊस कुरतडल्याने उसाची वाट लागली आहे. वेळीच रानडुकरांचा वनविभागाने बंदोबस्त केला नाही तर परिसरातील ऊस शेतीसह मका पिकेही उद्ध्वस्त होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. तेव्हा वनविभागाने तात्काळ या रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या