
सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याने कोमपरगाव विधानसभा मतदरासंघात 22 उमेदवारांपैकी आठ उमेदवारांची माघार घेतली. त्यामुळे आता 14 उमेदवार रिंगणात असून यात 9 अपक्ष उमेदवार आहेत. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी योगेश चंद्रे यांनी दिली आहे.
उमेदवारांमध्ये दोन कोल्हे, दोन काळे, दोन परजणे यांचा समावेश आहे. माघारीनंतर स्नेहलता कोल्हे (कमळ), आशुतोष काळे (घड्याळ), राजेश परजणे (ऑटो रिक्षा), विजय वहाडणे (शिट्टी) यांच्यातच चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे.
माघार घेतलेले उमेदवार –
दिलीपराव मारुतराव तिडके (अपक्ष), खाटिक अल्लाउद्दीन समशुभाई (अपक्ष), लोंढे शरद लक्ष्मण (अपक्ष) , आढाव नारायण माधवराव (अपक्ष), आभाळे नानासाहेब मुरलीधर (अपक्ष), आव्हाड प्रभाकर सीताराम (अपक्ष), आगवण ज्ञानदेव देवराम (अपक्ष) , टेके रावसाहेब चांगदेव (अपक्ष)
उमेदवारी नामांकन अर्ज राहिलेले उमेदवार आणि त्यांची चिन्हे –
आशुतोष अशोकराव काळे (चिन्ह – घड्याळ | पक्ष – नँशनँलिस्ट काँग्रेस पार्टी)
स्नेहलता बिपीनदादा कोल्हे (चिन्ह – कमळ | पक्ष – भारतीय जनता पार्टी)
माधव सखाराम त्रिभुवन (चिन्ह – हत्ती | पक्ष – बहुजन समाज पार्टी)
कवडे शिवाजी पोपटराव (चिन्ह – जेवणाचे ताट | पक्ष – बळीराजा पार्टी)
कोल्हे शितल दिगंबर (चिन्ह – कपबशी | पक्ष – हिंदूस्थान जनता पार्टी)
अशोक विजय गायकवाड (चिन्ह – गँस सिलेंडर | पक्ष – अपक्ष)
आहिरे मगन पांडुरंग (चिन्ह – ट्रक | पक्ष – अपक्ष)
उकिरडे सुदाम पंढरीनाथ (चिन्ह – बँट | पक्ष -अपक्ष)
काळे अशोक नामदेव (चिन्ह – किटली | पक्ष – अपक्ष)
परजणे राजेश सखाहरी (चिन्ह – फलंदाज | पक्ष – अपक्ष)
राजेश नामदेवराव परजणे (चिन्ह – आँटो रिक्षा | पक्ष – अपक्ष)
वहाडणे विजय सूर्यभान (चिन्ह – शिट्टी | पक्ष – अपक्ष)
शाह अलिम छोटू (चिन्ह – मुसळ आणि खलबत्ता | पक्ष – अपक्ष)
साळुंके दिपक गणपतराव (चिन्ह – ट्रँक्टर चालविणारा शेतकरी | पक्ष – अपक्ष)































































