कोपरगाव मतदारसंघात ‘मशाल’ घराघरात पोहोचवणार; निर्धार मेळाव्यात शिवसैनिकांचा संकल्प

कोपरगाव मतदारसंघात ‘मशाल’ घराघरात पोहोचवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. निर्धार मेळाव्यात शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रणनीती ठरली असून यासंदर्भात लवकरच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेण्याचे ठरविण्यात आले आहे. येणाऱ्या काही दिवसात आचारसंहिता लागणार असल्याने मतदारसंघात 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्टपर्यंत भगवा सप्ताहाचे आयोजन करण्याचे निर्देश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. ‘शिवसंपर्क मोहीम लक्ष्य 2024’ ही नवी मोहीम दिली आहे. त्यामुळे जोमाने काम करा, असे निर्देशही उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्कप्रमुखांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर कोपरगाव विधानसभा मतदार संघात गुरुवारी व्यापारी धर्मशाळा येथे नगर उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या अध्यक्षतेखाली निर्धार मेळावा झाला.

या मेळाव्यात विधानसभा संघाचा आढावा घेत पक्षाचे मशाल चिन्ह शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच घराघरात पोहोचविण्याचा निर्धार कोपरगाव येथे झालेल्या निर्धार मेळाव्यातून करण्यात आला आहे. यावेळी उमेदवार कोणीही असला तरी चालेल, पण कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्याने उमेदवाराला निवडून देण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच कोपरगावचा उमेदवार हा मशालचाच असावा, असा आग्रह कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

यावेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, राजेंद्र झावरे, कैलास जाधव,संजय सातभाई, सुनील तिवारी, प्रमोद लबडे, योगेश बागुल, किरण बिडवे, किरण खर्डे, श्रीरंग चांदगुडे, कालुअप्पा आव्हाड, अश्विनी होने, कलविंदरसिंग दडियाल, प्रविण शिंदे, मनोज कपोते, भरत मोरे, असलम शेख, मुकूंद सिनगर, अतुल काले, रवि कथले, संजय दंडवते, राजू शेख, शब्बीर शेख आदि पदाधिकारी व शिवसैनिक हजर होते. शिवाजी ठाकरे यांनी प्रास्ताविक केले राहुल देशपांडे यांनी सूत्रसंचालन तर अस्लम शेख यांनी आभार व्यक्त केले.