कोपरगाव- मुलाला नोकरीचे आमिष दाखवून नायब तहसीलदाराची 1 लाख 32 हजारांची फसवणूक

विश्वास संपादन करून मुलास नोकरी देण्याच्या नावाखाली 1 लाख 32 हजार रुपयांची फसवणूक उघड झाली आहे. याविरोधात कोपरगाव तहसीलच्या नायब तहसीलदार बाईंनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे

मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव येथील मनिषा प्रभाकर कुलकर्णी (44, रा. गुलमोहोर कॉलनी, इंदिरापथ) यांचा मुलगा नोकरीच्या शोधात होता. आरोपी नितीन शहाजी धुमाळ (रा. मुसळवाडी, ता. राहुरी जि. नगर) याने कुलकर्णी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या मुलास नोकरीला लावण्याचे अमिष दाखवले. या आमिषावर भुलवून धुमाळ याने एप्रिल 2018 ते जून 2018 या दरम्यान त्यांच्याकडून एक लाख 32 हजार रुपये रोख रक्कम स्वतःच्या एम.एस.ई.बी. ऑफीस अ. नंगर येथे तसेच अॅक्सिस बँक शाखा खात्यात जमा करून घेऊन त्यांची फसवणूक केली आहे.

पीडित मुलाच्या आईने कोपरगाव शहर पोलिसात तक्रार नोंदवली. वडगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. 391 आर. पी. पुंड हे पुढील तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या