कोपरगाव – विद्युत वाहिनीला दोन मुलींचा चिकटून मृत्यू, तर दोन बचावल्या

691

विद्युत वाहिनीचा धक्का लागून दोन मुली मृत झाल्याची घटना नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी शिवारात श्रीकृष्ण मंदिराच्या मागे समृद्धी मार्गावर रस्त्याच्या कडेला उभे असताना एका मुलीचा पाय घसरला. तिने पडत असताना तिने दुसऱ्या मुलीचा हात धरला. त्यावेळी तेथून गेलेल्या उच्च दाबाच्या काही हजार केव्हीच्या लाइनचा जोरदार धक्का बसला व त्यात त्या दोघींचाही जाग्यावरच मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.

धनश्री मंगेश पालवे (5, रा. जेऊर कुंभारी) व प्रगती नितीन आव्हाड (9, रा. बेट) अशी मुलींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जेऊर कुंभारी शिवारातील कृष्ण मंदिर मागील समृद्धी महामार्गावर रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास चार मुली स्कुटी वरून फिरायला गेल्या होत्या. यातील धनश्री मंगेश पालवे (5) व प्रगती नितीन आव्हाड (9) या दोघी रस्त्याच्या कडेला उभे असताना एका मुलीचा पाय घसरला पडत असताना तिने दुसऱ्या मुलीचा हात धरला. त्यावेळी तेथून गेलेल्या उच्च दाबाच्या काही हजार केव्हीच्या लाइनचा जोरदार धक्का बसला व त्यात त्या दोघींचाही जाग्यावरच मृत्यू झाला तर दोन जणी स्कुटीवर असल्यामुळे त्या बचावल्या.

समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून रस्त्याची माती मुरूम यांचा भराव टाकून उंची 30 ते 35 फूट करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेजारी असलेल्या विद्युत पोलच्या तारा या रस्त्याच्या समांतर होऊन अति जवळ आल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस पोहोचले. दोन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांची पुढील कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

आपली प्रतिक्रिया द्या