कोपरगाव- अल्पवयीन मुलीवर तरुणाकडून बलात्कार

1705

कोपरगाव येथील एका अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. अविनाश नारायण पंडोरे (28, शिक्षण रा. मोहिनीराज नगर) असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पीडिता नववीची विद्यार्थिनी असून ती कोपरगाव येथे आई आणि आजीसह राहते. अविनाशने तिला मोबाईल फोन घेऊन दिला होता. तसंच तिला प्रेमाची फूसही लावली होती. तसंच अविनाशने पीडितेच्या आजीला जिवे मारण्याची धमकीही दिली होती. तिला धमकी देऊन अविनाशने तिच्याच घरात तिच्यावर चार दिवस बलात्कार केला. मात्र, पीडितेने ही बाब कुणालाही सांगितली नाही.

पीडितेकडील मोबाईल फोन आणि तिचं सतत फोनवर बोलणं पाहून तिच्या शाळेतील शिक्षिकेला संशय आला. तिने मोबाईल ताब्यात घेऊन त्यांचे मेसेज पाहिले आणि तिच्या आईला बोलावून घेतले. आईसमोर पीडितेने तिच्यावर झालेल्या बलात्काराची कबुली दिली. या प्रकरणी पीडितेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर अविनाश याला पोक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या