कोपरगाव – दारूच्या नशेत पोहायला गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू

411
sunk_drawn_death_dead_pic

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण गोदावरी नदी पात्रात दारूच्या नशेत पोहायला गेलेल्या तरूण चालकाचा बुडून मृत्यू झाला आहे.

गणेश अशोक पवार (21, रा. धरणग्रस्त नगर, वैजापूर, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर) हा 30 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात गोदावरी नदी पात्रात दारूच्या नशेत पोहायला गेला व पाण्यात पडून तरुणाचा बुडून मृत्यू झाला.

याबाबत मयताचा भाऊ राहुल अशोक पवार याने कोपरगाव शहर पोलिसात माहिती दिली. त्यावरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सदर घटनेचा तपास शहर पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक /856 दारकुंडे हे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या