पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पुन्हा एकदा ‘हीट अँड रन’ ची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहखात्यावर निशाणा साधला आहे. सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर पोस्ट करत सुप्रिया सुळे यांनी घटनेवर संताप व्यक्त केला आहे. नशेच्या अंमलाखाली वाहने चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पुन्हा एकदा ‘हीट अँड रन’ चा प्रकार उघडकीस आला. या घटनेत एका डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला. आलिशान गाडी चालविणाऱ्या वाहनचालकाने या तरुणाला उडविल्यानंतर तेथून पलायन केले. ही व्यक्ती नशेत असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. कोरेगाव पार्क सारख्या परिसरात… https://t.co/CFa6YPlemQ
— Supriya Sule (@supriya_sule) October 11, 2024
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पुन्हा एकदा ‘हीट अँड रन’ चा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत एका डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला. आलिशान गाडी चालविणाऱ्या वाहनचालकाने या तरुणाला उडविल्यानंतर तेथून पलायन केले. ही व्यक्ती नशेत असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. कोरेगाव पार्क सारख्या परिसरात नशेच्या अंमलाखाली असताना गाडी चालविणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. मध्यंतरी ‘पोर्शे कार हीट अँड रन’ प्रकरणानंतर देखील अशा घटनांवर आळा घालण्यात गृहखात्याला यश आले नाही. या घटनांचे मूळ कारण असणारे पब आणि बार यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. नशेच्या अंमलाखाली वाहने चालविणाऱ्या व्यक्तींवर देखील कठोर कारवाई होण्याची गरज आहे, असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.