कोथरूडमधून चंद्रकांत पाटील यांना कडवे आव्हान, सर्वपक्षीय संमतीने एकच उमेदवार रिंगणात

2205
chandrakant patil bjp minister says maharashtra
कोथरुड-चंद्रकांत पाटील

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांची नाराजी दूर करण्यात यश मिळवले असले तरी या मतदारसंघातून सर्व पक्षांच्या सहमतीने एकच उमेदवार रिंगणात उतरवण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना कडवे आव्हान निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोथरूडमध्ये भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी पुन्हा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने मागील पाच वर्षांपासून मतदारसंघ बांधला होता. पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी यंदा थेट निवडणूक लढवून विधानसभेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सेफ मतदारसंघ म्हणून कोथरुड मतदारसंघाची निवड केली. त्यामुळे मेधा कुलकर्णी प्रचंड नाराज झाल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात मेधा कुलकर्णी यांनी त्यांच्या समर्थकांसह चंद्रकात पाटील यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, तिकीट कापल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मनसेकडून आँफर आल्याचे त्यांनी सांगितले. पण आपण भाजपशी एकनिष्ठ असून पक्षासाठी काम करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पुण्यात आयोजित केलेल्या सभेला मेधा कुलकर्णी यांनी हजेरी लावून चंद्रकात पाटील यांच्यासाठी प्रचार करणार असल्याचे जाहीर केले.

राष्ट्रवादी काँग्रेसने तरी सर्व विरोधकांच्या वतीने कोथरूडमध्ये एकच उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या रणनीतीला पाठिंबा दिला आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी राष्ट्रवादीमध्ये सल्लामसलत सुरू आहे. कोथरूडमध्ये मनसेचे ऍड. किशोर शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसनेही या मतदारसंघात अजून उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे मनसेच्या उमेदवाराला सर्व विरोधी पक्षांच्या वतीने पाठिंबा देण्याची रणनीती आखली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या