दापोलीतून कौस्तुभ लिमये यांची वाशी बाजारात पहिली आंब्याची पेटी रवाना

866

दापोली तालूक्यातील पाडले गावातील आंबा बागायतदार कौस्तुभ लिमये यांनी यावर्षीच्या हंगामातील पहीली आंबापेटी वाशी बाजारात विक्रीसाठी पाठवली आहे. जिल्हयातून पहिली आंबापेटी पाठविण्याचा मान त्यांनी मिळविला आहे. पाडले येथील लिमये हापूस आंबा फर्मचे कौस्तुभ लिमये यांनी या वर्षीच्या आंबा हंगामातील 4 डझनाची पहिली हापूस आंबापेटी नवी मुंबईतील वाशी बाजारात योगेश सुरेश कुटे या फळविक्री अडत्याकडे विक्रीसाठी पाठविली आहे.

कौस्तुभ लिमये यांनी पाडले येथीलच दिपक गुहागरकर यांच्या नारळी बागेतील सप्टेंबरमध्येच मोहरलेला हापूस आंबा मोहरावर आंबे काढण्यासाठी घेतला होता.त्यानंतर त्यांनी किटकनाशक फवारण्या करून सप्टेंबर महिण्यात मोहरलेल्या व वातावरणातील बदलत्या हवामानातील हवामानाशी सामना करत आंब्याचे मोहर किटकनाशक फवारणीव्दारे टिकवून ठेवले. त्याचे फळ झाल्यावर आता पहिली आंबापेटी विक्रीला पाठविली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात साधारणपणे 6 आंबापेटया विक्रीस तयार होतील. तर 15 फेब्रुवारीदरम्यान आणखी 15 ते 20 पेटया तयार होतील, असे लिमये यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या