
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
अरविंद केजरीवाल यांचे एकेकाळचे अत्यंत विश्वासू सहकारी कुमार विश्वास हे त्यांच्यापासून दुरावले आहेत. आपमधून आशुतोष यांच्यापाठोपाठ पत्रकार आशिष खेतान यांनीही राजीनामा दिला आहे. वकिली करण्यासाठी आपण पक्षाचा राजीनामा देत असल्याचं कारण खेतान यांनी दिलं आहे.
I had resigned from DDC in April, to join the legal profession. That is all. Not interested in rumours
— Ashish Khetan (@AashishKhetan) August 22, 2018
कुमार विश्वास यांनी या सगळ्या परिस्थितीवर ट्विटरवरून टीका केली आहे. केजरीवाल यांचे नाव न घेता टीका करताना विश्वास यांनी म्हटलंय की आम्ही तुम्हाला चंद्रगुप्त बनवायला निघालो होतो, आम्हाला काय माहिती तुम्ही चंदा गुप्ता व्हाल
हम तो “चँद्र गुप्त” बनाने निकले थे हमें क्या पता था “चँदा गुप्ता” बन जाएगा
— Dr Kumar Vishvas (@DrKumarVishwas) August 22, 2018
आशुतोष यांनी आप सोडण्यामागे राज्यसभेला त्यांच्याऐवजी उद्योगपती सुशील गुप्ता यांना तिकीट देणं हे महत्वाचे कारण मानले जातंय. या उमेदवारीवरून झालेल्या वादानंतर केजरीवाल यांना एनडी गुप्ता यांना उमेदवारी देण्याचं ठरवलं होतं. या प्रकरणावरूनच कुमार विश्वास यांनी चँदा गुप्ता म्हणजेच गुप्तपणे देणगी घेणारे गुप्ता अशी उपमा देत केजरीवाल यांच्यावर टीका केल्याचं बोललं जातंय.























































