मोदींना मत दिले ना, मग त्यांना जाऊन विचारा; मुख्यमंत्री कुमारस्वामींचा अजब पवित्रा

kumaraswamy karnataka cm

सामना ऑनलाईन । बेंगळूरू

कर्नाटकात लोकसभेतील पराभव हा कुमारस्वामींच्या चांगल्याच जिव्हारी लागला आहे. म्हणून काही आंदोलकांना त्यांनी मोदींकडे जाण्याचा सल्ला दिला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी हे ग्राम प्रवास अभियानंतर्गत राज्यभर प्रवास करत आहेत. या प्रवासादरम्यान करेगुड्डा भागात येरमरस थर्मल पावर स्टेशनच्या कर्मचार्‍यांनी त्याचा ताफा रोखला. वेतन वाढ आणि इतर मुद्द्यांसाठी त्यांचे आंदोलन सुरू होते. आंदोलनदरम्यान उपस्थित जमावाने मुख्यमंत्री शेम शेम अशा घोषणा केल्या. मुख्यमंत्री कुमारस्वामी खिडकीशेजारीच बसले होते. तेव्हा त्यांनी रागाच्या भरात ‘‘मोदींना मतं दिली ना तर जा त्यांना जाऊन प्रश्न विचारा” असे आंदोलनकर्त्यांना सांगितले. त्यावरूनही आंदोलनकर्ते घोषणा करतच होते. याचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे.

लोकसभा निवडणुकीत जेडीएसचा दारूण पराभव झाला. या निवडणुकीत कुमारस्वामींचे वडील माजी पंतप्रधान एच डी कुमारस्वामी यांचाही पराभव झाला. हा पराभव कुमारस्वामींना पचला नाही त्यामुळे त्यांनी आंदोनकर्त्यांनाच मोदींना जाऊन प्रश्न विचारा असा अजब पवित्रा घेतला होता.