सत्य का काम है चुभना, पोस्ट शेअर करत कुणाल कामराने सत्ताधाऱ्यांना डिवचले

कॉमेडियन कुणाल कामराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पुन्हा एकदा अप्रत्यक्षरित्या सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. कुणाल कामराने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्याने देशात सुरू असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं आहे. या पोस्टसोबत कुणालने ‘सत्य का काम हे चुबना’ अशी कॅप्शन शेअर करत सत्ताधाऱ्यांना डिवचले आहे.

”जेव्हा शब्दांची भिती वाटायला लागेल तेव्हा समजून जा सत्य कुठेतरी आवाज देतेय. इतिहासात आपण कायम पाहिले आहे सर्वात आधी आवाज रोखला जातो. कधी भिती दाखवून, कधी कायद्याचा धाक दाखवून, कधी पडद्याआडून. जिथे प्रश्न विचारले जातात तिथेच बदल घडवला जातो. सत्याचे काम आहे टोचणे. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना या टोचण्याचीच जास्त भिती वाटत असते. लक्षात ठेवा जिथे लोकं हसतात, विचार करतात, प्रश्न करतात तिथूनच खरे स्वातंत्र्य सुरू होतं. जेव्हा इतिहास लिहला जाईल तेव्हा शांतता नाही तर ज्या शब्दांना रोखायचा प्रयत्न झाला तेच लक्षात राहतील’, असे कुणालने शेअर केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे.