बसेसची मागणी करत परप्रांतीय कामगारांचा ठिय्या, हातकणंगले बस स्थानकात काहीकाळ वातावरण तंग

604

हातकणंगले बस स्थानकात 15 मे रोजी म्हणजेच शुक्रवारी सकाळी सात वाजता अचानक हातकणंगले परिसरामधील चारशेहून अधिक परप्रांतीय कामगारांनी ठिय्या मांडला. यामुळे प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. पोलीस प्रशासनाने तात्काळ जयसिंगपूर येथील अतिरिक्त पोलीसफाटा मागवून या गर्दीवर नियंत्रण आणले.

हातकणंगले नगरपंचायतीमार्फत गुरुवारी साडेसहाशे परप्रांतीयांसाठी विशेष बस सोडण्यात आल्या होत्या. हे कळताच अनेक परप्रांतीयांनी विना परवानगी बसस्थानकात गर्दी करायला सुरुवात केली. बस सोडत नसल्याचा राग आल्याने या मजुरांनी स्तानकातच ठिय्या मांडला. आम्हालाही आमच्या गावी जाण्यासाठी गाड्या उपलब्ध करा अशी मागणी हे मजूर करत होते. जयसिंगपूर येथील अतिरिक्त पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने या मजुरांना शांत करण्यात यश आले. हे मजूर ज्या भागातून आले होते, त्या भागात त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था केल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे निवळली . हातकणंगले नगरपंचायतीचे नगरसेवक, नगराध्यक्ष यांनीही पुढाकार घेऊन परप्रांतीय कामगारांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष दिले.

आपली प्रतिक्रिया द्या