लाडकी बहिण योजनेत मोठा गैरप्रकार, 30 आधारकार्ड वापरून केले 30 अर्ज

सातारा जिल्ह्यातील एका व्यक्तीने 30 महिलांचे आधारकार्ड वापरून लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरल्याचे समोर आले आहे. या 30 पैकी 26 बँक खात्यांमध्ये पैसेही जमा झाल्याचे समोर आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

खारघरमधील रहिवाशी असलेल्या पूजा महामुनी यांनी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केला होता. मात्र त्यांचा अर्ज स्वीकारला जात नव्हता. त्यामुळे त्यांनी याबाबत पनवेल शहरातील माजी नगरसेवक नीलेश बाविस्कर यांच्याकडे याची तक्रार केली. बाविस्कर यांनी याबाबत चौकशी केली असता पूजा यांचा अर्ज आधीच स्वीकारला गेला असल्याचे समोर आले. त्यानंतर या प्रकरणाची अधिक चौकशी केल्यानंतर त्यांना साताऱ्यातून पूजा यांचा आधार नंबर वापरला गेल्याचे समोर आले. तसेच पूजा यांचा आधार नंबर वापरून केलेल्या अर्जात असलेल्या फोन नंबरवरून 30 अर्ज भरले गेल्याचे देखील समोर आले आहे. याबबात बाविस्कर यांनी या बाबत पनवेल तहसील कार्यालयात तक्रार करून योग्य कारवाईची मागणी केली आहे