लाडकी बहीण योजनेचा फेर आढावा घेणार

लाडक्या बहीण योजनेत पात्र नसलेल्या काही लाख महिला लाभ घेत असल्याच्या बातम्या येत आहेत. याचा तपास करून योग्य लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल. याबाबत महिला बाल कल्याणच्या मंत्र्यांशी बोलणार आहे. लाडकी बहीण योजनेचा फेर आढावा घेऊ, त्याची छाननी करण्याबाबत बैठक घेतली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे द्राक्ष परिसंवाद वार्षिक अधिवेशन रविवारी वाकड येथे पार पडले. तेव्हा अजित पवार बोलत होते.

काही निघू देऊ नका, कृषिमंत्र्यांना सूचना

कृषिमंत्री दत्ता भरणे यांची चांगली शेती आहे. भरणे यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. पूर्वीच्या कृषिमंत्र्यांबाबत सातत्याने काहीतरी निघत होते. त्यामुळे भरणे यांना शोधून काढले. आता तुम्ही काही निघू देऊ नका, अशी सूचना पवार यांनी भरणे यांना केली.