या कारणाने लालू पुत्र तेज प्रतापने केला घटस्फोटासाठी अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि माजी मंत्री तेज प्रताप याने आपली बायको ऐश्वर्या रायला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्याने पाटण्याच्या कोर्टात अर्जही केला आहे. ऐश्वर्याने आपल्याला धोका दिल्याचा आरोप तेज प्रतापने केला आहे. तसेच यामुळे आपल्याला मानसिक त्रास झाल्याचेही त्याने सांगितले. पाटण्याहून रांचीला जाताना माध्यमांनी विचारल्यावर तेज प्रतापने ही प्रतिक्रिया दिली.

तेज प्रतापचे वकील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “दोघांमध्ये चांगले संबंध नव्हते, त्यामुळे ही गोष्ट घटस्फोटापर्यंत पोहोचली.” ‘आपल्याला कृष्णासारखे रहायचे आहे परंतु ऐश्वर्या ती राधा नाही बनू शकली’ अशी खंत तेज प्रतापने व्यक्त केली. दुसरीकडे लालू प्रसादच्या कुटुंबीयांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. लालू पुत्र तेज प्रताप आणि राजदचे आमदार आणि माजी मंत्री चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्या राय यांचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. या घटनेमुळे तेज प्रतापचे वैवाहिक आयुष्य धोक्यात आहे असे स्पष्ट होत आहे.