केदारनाथ मार्गावर कोसळली दरड , आठ जण जखमी

43

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे केदारनाथच्या महामार्गावर वाहतूक प्रभावित झाली आहे. केदारनाथच्या मार्गावर लिंचोलीजवळ दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत 8 जण जखमी झाले आहेत.

या ठिकाणी प्रशासनाची टीम पोहोचली असून त्यांनी बचाव कार्य सुरू केले आहे. सर्व जखमींना जवळच्या इस्पितळात दाखल केले आहे. या मार्गात सध्या अंधार असून  पोलीस आणि एसडीआरफचे कर्मचारीही उपस्थित आहेत.

रुद्रप्रयागच्या कंट्रोल रुमला मिळालेल्या माहितीनुसार भीमबलीच्या पुढे व रामवाडजवळ भीमलीच्या ठिकाणी भुस्खलन झाले आहे. त्यात 6 ते 8 जण जखमी झाले आहेत. तसेच काही लोक ढिगार्‍याखाली अडकल्याची भितीही व्यक्त करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या