
सिक्कीममधील उत्तरी भागात होत असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलन होत आहे. भूस्खलनामुळे जवळपास 200 पर्यटक अडकल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली आहे. मंगळवारी रात्री चुंगथांग-लाचेन मार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. यामुळे लाचेनला जाणारे पर्यटक अडकले. या पर्यटकांना रात्रभर आयटीबीपी कॅम्प आणि गुरूद्वारामध्ये ठेवण्यात आले. त्यांना आवश्यक सुविधा पुरवण्यात आली. सध्या भूस्खलन झालेल्या ठिकाणी मातीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. या मार्गावरील मातीचा ढिगारा हटवल्यानंतर पर्यटकांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल.
























































