लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी बिलाल सराफीची पाकिस्तानात हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानमधील मुरिके येथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारा लष्कर-ए-तोयबाचा सदस्य बिलाल आरिफ सराफी याची त्याच्याच कुटुंबातील सदस्यांनी निर्घृण हत्या केली. ही घटना पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात घडली असून, या हत्येमुळे दहशतवादी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

बिलाल सराफीवर त्याच्या कुटुंबातील लोकांनी आधी चाकूने सपासप वार केले आणि त्यानंतर त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या भीषण हल्ल्यात बिलालचा जागीच मृत्यू झाला. घरगुती वादातून बिलालची हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

दहशतवादी पार्श्वभूमी: बिलाल आरिफ सराफी हा लष्कर-ए-तोयबाचा एक महत्त्वाचा सदस्य होता आणि तो हिंदुस्थानविरोधी कारवायांमध्ये सक्रिय होता. मुरिके येथील लष्कर ए तोयबाच्या मोठ्या प्रशिक्षण केंद्रात तो तरुण दहशतवाद्यांना प्रशिक्षण द्यायचा.