
पूर, वादळासारख्या आपत्तीमुळे मोठय़ा प्रमाणात स्थलांतर मागील 10 वर्षांत हिंदुस्थानात 3.2 कोटींहून जास्त आपत्ती विस्थापितांची नोंद झाली. 2015 ते 2024 दरम्यान पूर आणि वादळासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे हिंदुस्थानात 3.23 कोटी विस्थापितांची नोंद झाली. ही आकडेवारी चीन आणि फिलिपिन्सनंतर जगात तिसऱ्या क्रमांकाची आहे. जिनिव्हा येथील इंटरनल डिसप्लेसमध्ये मॉनिटरिंग सेंटरमध्ये (आयडीएमसी ) 2015 ते 2024 दरम्यानच्या काळात 210 देश आणि प्रांतांत नैसर्गिक संकटांमुळे 26.48 कोटी लोक विस्थापित झाले किंवा सक्तीचे त्यांचे स्थलांतर करण्यात आले. पूर्व आणि दक्षिण आशिया सर्वाधिक प्रभावित प्रदेश आहे. आयडीएमसीच्या अहवालानुसार बांगलादेश, चीन, हिंदुस्थान, फिलिपीन्स, अमेरिकेने गेल्या दशकात विस्थापितांची सर्वाधिक आकडेवारी नोंदवली. चीनमध्ये 46.9 दशलक्ष तर फिलिपिन्समध्ये 46.1 दशलक्ष अंतर्गत विस्थापनांची नोंद झाली. पूर, वादळ विस्थापितांची संख्या अधिक आहे.
– आयडीएमसीच्या अहवालानुसार जागतिक आपत्ती विस्थापितांपैकी सुमारे 90 टक्के घटना पूर आणि वादळांमुळे घडल्या आहेत.
– 2015 ते 2024 दरम्यान जगातील बहुसंख्य आपत्ती विस्थापन वादळांमुळे घडले. यामध्ये 12.09 कोटी लोक स्थलांतरित झाले. याच कालावधीत पुरामुळे 11.47 कोटी लोक विस्थापित झाल्याचे समोर आले आहे.