आतिफ असलमवर लतादीदी भडकल्या; म्हणाल्या, ‘मी त्याचे गाणे…’

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूड अभिनेता जॅकी भग्नानी आणि कृतिका कामरा यांचा आगामी चित्रपट ‘मित्रो’ प्रदर्शनापूर्वीच चांगली प्रसिद्धी मिळवत आहे. या चित्रपटातील बॉलिवूडचा आघाडीचा गायक आतिफ असलम याने गायलेले ‘चलते चलते’ हे गाणे चांगले हिट होत आहे. परंतु याच गाण्यावरून भारतरत्न आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर या भडकल्या आहेत.

लतादीदी यांनी नुकतीच आयएएनएसला मुलाखत दिली. यात त्यांना जुन्या गाण्यांच्या रिमिक्स व्हर्जनबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा लतादीदी म्हणाल्या की, ‘मी अशी गाणी ऐकत देखील नाही आणि मला कधी ऐकावी असेही वाटत नाही. जुन्या गाण्याचा रिमिक्स बनवण्याचा ट्रेन्ड सुरू असून यामुळे मला अतिशय दु:ख होत आहे. यात मला कोणतीही नवीन रचना आढळत नाही.’ तसेच मी तर असे देखील ऐकले आहे की, रिमिक्स करताना जुन्या गाण्याचे बोलही बदलले जातात. कोणाच्या परवानगीने असे केले जाते? कवि आणि कंपोजरने तयार केलेल्या गाण्यामध्ये छेडछाड करणे आवश्यक आहे का? असा सवालही लतादीदींनी उपस्थित केला.