
नवीन Mahindra Thar ROXX खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना कंपनीने नवीन वर्षात धक्का दिला आहे. कंपनीने या कारच्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने याच्या किंमतीत 60,000 रुपयांपर्यंत वाढवली आहे. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही मॉडेल्सवर ही दरवाढ करण्यात आली आहे. मात्र चांगली गोष्ट म्हणजे कंपनीने पेट्रोलच्या 5 पैकी फक्त 1 व्हेरियंटची किंमत वाढवली आहे.
तर 13 पैकी 6 डिझेल प्रकारांच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. दोन्ही एंट्री लेव्हल व्हेरियंटच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच थार रॉक्स पेट्रोलची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 12.99 लाख रुपये आणि डिझेलची प्रारंभिक किंमत 13.99 लाख रुपये असेल. याच कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…
थार रॉक्समध्ये काय आहे खास?
महिंद्रा थार रॉक्सची लोकप्रियता तिच्या मजबूत बिल्ड क्वालिटी, पॉवरफुल परफॉर्मन्स आणि प्रभावी ऑफ-रोडिंग क्षमतांमुळे आहे. तसेच याचे व्हेरियंट आणि कस्टमायझेशन पर्याय हे सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी बनवण्यात आले आहेत.
प्रतीक्षा कालावधी
ऑटोकार इंडियाच्या रिपोर्टनुसार, याच्या डिझेल ऑटोमॅटिक 4×2 साठी सुमारे एक वर्षाचा प्रतीक्षा कालावधी आहे. तर आयव्हरी इंटिरियरसह 4×4 डिझेल ऑटोमॅटिक व्हेरिएंटची डिलिव्हरी लवकर मिळू शकते.



























































