इस्रोचे नवे मिशन शुक्रवारी लॉन्च होणार
इस्रोचे नवीन मिशन एसएसएलव्ही ईओएस-08 आता 16 ऑगस्ट रोजी लॉन्च केले जाणार आहे. इस्रो या मिशनला 15 ऑगस्टला लॉन्च करणार होते. परंतु आता एक दिवस तारीख पुढे ढकलली आहे. 16 ऑगस्टला सकाळी 9.17 वाजता हे मिशन लॉन्च केले जाणार आहे. इस्रोचे शेवटचे मिशन जीएसएलव्ही एफ14 हे 17 फेब्रुवारीला लॉन्च करण्यात आले होते. बऱ्याच महिन्यानंतर इस्रोने नव्या मिशनची घोषणा केली आहे. ईओएस-08 हे एक अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाइट आहे. हिंदुस्थानचे सर्वात छोटे लॉन्च व्हीकल, एसएसएलव्ही लॉन्च व्हीकल असेल. ही एसएसएलव्हीची तिसरी चाचणी असणार आहे.
ओयोचा आयपीओ पुन्हा पुढे ढकलला
ओयोचा आयपीओ पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे. ट्रव्हल टेक्नोलॉजी प्लॅटफॉर्म ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांनी ही माहिती दिली. ओयोच्या आयपीओकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. ओयोने मार्च 2023 मद्ये कॉन्फिडेंशिय फायलिंग अंतर्गत कागदपत्रे सादर केली होती. परंतु, कंपनीने दुसऱ्यांदा आयपीओचा अर्ज मागे घेतला आहे. आता खासगी गुंतवणूकदारांकडून चार अब्ज डॉलरच्या व्हॅल्यूएशनवर इक्विटी जमा करू शकते.
जान्हवी तिरुपतीच्या चरणी नतमस्तक
अभिनेत्री जान्हवी कपूर हिने मंगळवारी आई श्रीदेवीच्या जयंती दिनी तिरुपती मंदिरात जाऊन भगवान वेंकटेश्वरचे दर्शन घेतले. यावेळी तिच्यासोबत तिचा प्रियकर शिखर पहाडिया सुद्धा उपस्थित होता. जान्हवी नेहमी तिरुपती मंदिरात येते.
विप्रोच्या सुभा टाटावर्तींचा राजीनामा
आयटी कंपनी विप्रोच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) सुभा टाटावर्ती यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. कंपनीने आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे. सुभा टाटावर्ती या मार्च 2021 मध्ये विप्रोमध्ये सहभागी झाल्या होत्या. सुभा यांच्या आधी 17 मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमित चौधरी यांनी विप्रोमधून राजीनामा दिला होता. विप्रोमधून राजीनामा देणाऱ्या सुभा टाटावर्ती या तिसऱ्या वरिष्ठ अधिकारी आहेत.