भंडाऱ्यात लाडक्या बहिणींवर पोलिसांनी लाठीचार्ज कला. हा सगळा प्रकार शासकीय कार्यालयाच्या कार्यक्रमात घडला. याप्रकरणी प्रचंड संताप व्यक्त करत गरीब महिलांना सन्मान देण्याऐवजी त्यांची थट्टा उडवणयाचे काम महाभ्रष्टयुती सरकार करत असून हा तुमच्या खिशातला नाही तर जनतेचा पैसा आहे. लाडकी बहीण तुम्हाला माफ करणार नाही. अशा शब्दांत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
कामगार मंत्रालयाच्या पेटीवाटप कार्यक्रमात पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात सहा ते सात महिला गंभीर जखमी झाल्या. जर आपल्या गृहखात्याला गर्दी हाताळता येत नसेल आणि महिलांचा आदर राखता येत नसेल तर आपले सरकार कार्यक्रमांसाठी गर्दी कशाला जमावता? असा सवाल नाना पटोले यांनी फडणवीस यांना केला आहे.
लाडकी बहिण फक्त खात्यावर पैसे टाकून नाही तर तिचा मान, सुरक्षा आणि आदर देऊन करता येते. हाच तुमचा आणि या भाजपप्रणित मिंधे सरकारचा खरा चेहरा आहे. लाडकी बहीणच्या नावाने आपण फक्त महिलांना अमिष दाखवून त्यांची मतांसाठी फसवणूक करत आहात, असा आरोपही पटोले यांनी केला आहे.