लातूरात 2 लाख 40 हजार रुपये व कागदपत्रांची बॅग दुचाकीस्वारांनी पळवली

2 लाख 40 हजार रुपये असणारी बॅग आणि त्यामधील कागदपत्रे अज्ञात दुचाकीस्वारांनी पळवून नेली. भर दिवसा ही घटना घडली असून या प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात अज्ञात दोघा दुचाकीस्वारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील घटनेसंदर्भात विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात यशवंत साहेबराव सोनवणे रा. लक्ष्मीधाम कॉलनी लातूर यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, औसा रोडवरील चौंडा पेट्रोलपंपासमोरील पंक्चरच्या दुकानासमोर ते खुर्चीवर बसलेले होते. अज्ञात दुचाकीवर आलेल्या युवकाने त्यांच्या हातामधील बॅगला हिसका मारुन बॅग घेतली. बॅगमध्ये कागदपत्रे आणि रोख 2 लाख 40 हजार रुपये होते. भरधाव वेगात ते राजीवगांधी चौकाच्या दिशेने निघून गेले. पोलीसांनी अज्ञात दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपनिरीक्षक सोनवणे हे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या