लातूर जिल्ह्यासाठी सलग दुसरा दिवस दिलासादायक ठरला, 28 रुग्ण बरे होऊन घरी परतले

1799

लातूर जिल्ह्यातील वाढत जाणारी कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आणि रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण लातूरकरची चिंता वाढवणारी असली तरी सलग दुसरा दिवस मात्र लातूरकरांसाठी दिलासादायक ठरला आहे. तब्बल 28 रुग्ण दुसऱ्या दिवशी बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत.

मागील काही दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे दररोज कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यूही होत आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी आरोग्य विभाग अहोरात्र काम करत आहे तर स्थानिक प्रशासन सुद्धा आपल्या परीने झटत आहे. सहा जुलै रोजी लातूर जिल्ह्यातील 23 रुग्ण बरे होऊन घरी परतले होते. त्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला होता पुन्हा सात जुलै रोजी तब्बल 28 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. कोरणा ग्रस्त रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परत त्यांची संख्या आता वाढत आहे. लातूर जिल्ह्यातील कोरणा ग्रस्त रुग्णांची संख्या आता 537 वर पोहोचली आहे. समाधानाची बाब म्हणजे तब्बल 298 रुग्ण उपचारानंतर आपल्या घरी परतले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या