लातूर जिल्ह्यातील पाटोदा येथील कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू

1481
corona virus

लातूर जिल्ह्यात कोरोनाचे नवीन सहा रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान अहमदपूर तालुक्यातील मौजे पाटोदा येथील एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या चारवर पोहोचली आहे.

03 जुन 2020 रोजी लातूर जिल्ह्यातील एकुण 66 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यामध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 22 व्यक्तींचे स्वॅब होते. त्यापैकी 18 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 04 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये 02 व्यक्ती रेणापूर तालुक्यातील कामखेडा येथील असुन त्या 7 दिवसांपूर्वी मुंबई येथून प्रवास करून आलेले आहेत. तसेच 01 व्यक्ती औसा तालुक्यातील हिप्परगा येथील असून तो मुंबई येथून प्रवास करून आलेला आहे . *01 व्यक्ती कादरी नगर औसा येथील असून तो व्यक्ती सोलापूर येथून प्रवास करून आलेला आहे*.

कोविड केअर सेंटर लातूर येथून 37 व्यक्तींचे स्वॅब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 35 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 02 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या दोन्ही व्यक्ती संभाजी नगर लातूर येथील रहिवाशी आहेत. अहमदपूर तालुक्यातील पाटोदा येथील 01 व्यक्ती मागिल 11 दिवसापासून या रुग्णालयात उपचार घेत होता. त्या व्यक्तीला पूर्वीपासूनच हृदयाचा आजार होता व त्याचा कोरोना (कोविड19) मुळे मृत्यू झाला आहे.

उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 03 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी सर्वच 03 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. निलंगा 01, चाकूर 02, देवणी 01 असे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्या सर्व व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

याप्रकारे लातूर जिल्ह्यातून एकूण 66 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 60 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 06 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या