लातूर बाजार समिती शेतमाल विक्रीची रक्कम शेतकऱ्यांना ऑनलाईन देणार

2264
crop-loan-4

राज्य शासनाच्या नव्या धोरणानुसार आता बाजार समितीत शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून रोखीने पैसे मिळणार नाहीत, त्यासाठी शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीत विक्रीस आणताना आपले बँक पास बुक, आधारकार्ड सोबत आणावे असे आवाहन लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष ललितकुमार शहा, उपसभापती मनोज पाटील, सर्व सन्माननीय संचालक यांनी केले आहे.

बाजार समितीत शेतीमाल विक्रीसाठी आणताना शेतकऱ्यांनी ज्यांच्या नावावर माल असेल त्यांच्या नावाचे बँकेचे पास बुक, आधारकार्ड सोबत घेऊन यावे असे सांगत जेणे करून त्या शेतकऱ्यांना विक्रीचे धनादेश ड्रॉफ्ट /आरटीजीएसने त्यांच्या खात्यावर देता येईल रोख स्वरूपाचे देयके देण्यात येणार नाहीत, असे आदेश शासनाने दिले आहेत

लातूर येथील बहुतांश व्यापारी शेतकऱ्यांची उलाढाल कोट्यवधीची रुपयांची आहे तसेच टीडीएसमुळे 2% भुर्दंड व्यापाऱ्यास बसणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल विक्रीसाठी आणताना आपले बँक पासबुक आधारकार्डसोबत घेऊन यावे व बाजार समितीस सहकार्य करावे, असे आवाहन लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललित कुमार शहा, उपाध्यक्ष मनोज पाटील, सचिव एम जी गुंजकर यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या