लातूर – बारमधून 2 लाख 53 हजाराची दारु पळवली

liquor Liqueur

शिरुर अनंतपाळ तालूक्यातील मौजे साकोळ येथील बारमधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 2 लाख 53 हजार 640 रुपयांची दारु चोरुन नेली. या प्रकरणी शिरुरअनंतपाळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल गुरुनाथ देवनगरे रा.शिरुरअनंतपाळ यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, साकोळ येथील त्यांच्या मालकीच्या हॉटेल गुरुदिप बारमधून अज्ञात चोरट्यांनी आर.एस.कंपनीच्या 375 एमएलच्या बाटल्या दोन बॉक्स विंâमत 16 हजार रुपये,एस.कंपनीचे 180 एम.एलचे 12 बॉक्स ज्यामध्ये 576 बाटल्या होत्या किंमत 97920 रुपये, आर.एस.वंâपनीच्या 90 एम.एलच्या 800 बाटल्या किंमत 30220 रुपये आय.बी.वंâपनीच्या 90 एम.एलच्या 500 बाटल्या किंमत 37500 रुपये असा एकूण 253640 रुपयांचा मुद्देमाल पळवला.

आपली प्रतिक्रिया द्या