लातूर शहर व लगतच्या 20 गावात आणखी 15 दिवस कडक लॉकडाऊन!

लातूर शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. कोरोनाचा संसर्ग लातूर शहरातून ग्रामीण भागात वाढू नये आणि आरोग्य यंत्रणेवर ताण येवू यासाठी लातूर शहर व लगतच्या 20 गावांत 1 ते 15 ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाऊन कायम ठेवण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्र आणि उर्वरित ग्रामीण भागात लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी 31 जुलै रोजी जारी केले आहेत.

लातूर शहर व लगतची 20 गावे गंगापुर, पेठ, चांडेश्वर, खोपेगाव, कव्हा, कातपुर, बाळलगांव, सिंकदरपुर, बसवंतपुर, खाड़गांव, पाखरसांगवी, कोळपा, हरंगुळ बु. बोरवटी, मळवटी, आर्वी, वासनगाव, हणमंतवाडी, महाराणा प्रताप नगर आदी गावात 1 ते 15 ऑगस्ट या कालावधीत कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. गेली 15 दिवस ज्या पद्धतीने कडक लॉकडाऊन सुरू होते ते सर्व नियम तसेच लागू राहतील. आणि हा लॉकडाऊन शेवटचा टप्पा असणार आहे. असे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले आहे.

नगरपालिका/ नगरपंचायत क्षेत्रात 1 ते 7 ऑगस्ट लॉकडाऊन निर्बंधासह शिथिल
जिल्ह्यातील नगर पालिका, नगर पंचायत क्षेत्रात 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान लॉकडाऊन निर्धारित वेळेत शिथिल करण्यात आले आहे. या क्षेत्रात सर्व किराणा, भाजीपाला, बेकरी, फळांची दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहतील. आणि सकाळी 9 वाजेपर्यंत विक्रेत्यासाठी ठोक विक्री सुरु राहील. मटन, चिकन, अंडी विक्रीची दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहतील. शिवभोजन नियमित वेळेत सुरू राहील. जार, टैंकरने पाणी पुरवठा सायं. 7 पर्यंत सुरू राहिल. इंटरनेट सारख्या संपर्क साधनांची सेवा देणाऱ्या अस्थपना सुरू राहतील. शेतीच्या मशागतीची कामे सुरू राहतील. वाहनांचे अधिकृत्त सर्विस सेंटर, गैरेज सुरू राहतील. मात्र लग्न समारंभ, मंगल कार्यालय बंद राहील. 20 व्यक्ती मर्यादेसह नोंदणी विवाहास परवानगी असेल.

8 ते 31 ऑगस्ट दरम्यान सर्व दुकाने, बाजारपेठ सुरू
जिल्ह्यातील नगर पालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात 8 ते 31 ऑगस्ट पर्यंत तसेच उर्वरित ग्रामीण भागात 1 ते 31 ऑगस्ट पर्यंत सर्व अत्यावश्यक सेवा निर्धारित नियमित वेळेनुसार सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा सोबतच इतर सर्व आस्थापना, बाजारपेठ, दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरु राहतील. मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्स 5 ऑगस्टपासून सकाळी 9 ते 7 दरम्यान शारीरिक अंतर, मास्कच्या बंधना सह सुरू राहतील. सिनेमागृह बंद राहतील, जिल्ह्यातंर्गत बससेवा 50 टक्के प्रवाशी क्षमतेनुसार सुरू राहील.

त्यासाठी शारीरिक अंतर आणि बसचे निर्जंतुकीकरण बंधनकारक आहे. आंतरजिल्हा हालचाली, वाहतूक पूर्वीप्रमाणे निर्बंधासह सुरू राहील. खुल्या मैदानात शारीरिक अंतर पाळून व्यायाम, खेळ खेळता येतील. वृत्तपत्राची छपाई, वितरण करता येईल. सर्व शैक्षिणिक संस्था बंद राहतील. केश कर्तनालय, ब्यूटी पार्लर निर्बंधासह सुरु राहील. वाहतुकिस मुभा असेल पण त्यामध्ये दुचाकीसाठी चालक आणि एक व्यक्ती, तीन चाकीसाठी चालक आणि 2 व्याक्ती तर चार चाकी वाहनासाठी चालक आणि 3 व्याक्तिला परवानगी असणार आहे. अंत्यविधिसाठी 20 लोकांना परवानगी असेल.

आपली प्रतिक्रिया द्या