लातूर येथील कोरोनाग्रस्तांचा जालन्यात प्रवास, संपर्कात आलेल्या 26 जणांची तपासणी

1811

लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे आढळून आलेले कोरोना पॉझिटिव्ह जालना जिल्ह्यातील शहागड येथे थांबले होते आणि शहागड ला त्यांना जेवण देण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या 26 जणांना तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

तबलिगी समाजाचे 8 जण निलंगा येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हे सर्व जण जालना जिल्ह्यातील शहागड येथे 30 मार्च रोजी काही काळासाठी थांबले होते. शहागड येथे या सर्वांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. निलंगा येथे जाण्यापूर्वी ते शहागड येथे आले होते. संभाजी नगर- सोलापुर या राष्ट्रीय महामार्गावर शहागड हे गाव असून मुस्लिम बहुल आहे. या गावात त्यांची व्यवस्था केल्यामुळे व्यवस्था करणारे, त्यांच्या संपर्कात आलेल्या अशा 26 जणांना तापसणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी 4 वाजेच्या सुमारास दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या