लातूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 668 वर पोहोचली, 33 जणांचा मृत्यू

1096

लातूर जिल्ह्यातील आजपर्यंत 6685 रुग्णांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आलेली आहे त्यापैकी 668 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. जिल्ह्यात आजपर्यंत 33 जणांचे मृत्यूही झालेले आहेत. 11 जुलै रोजी जिल्ह्यात 34 पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत. तसेच औराद शहाजनी ता. निलंगा येथील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यूही झालेला आहे.

लातूर जिल्ह्यतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही काही कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील 6686 जणांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आलेली आहे, त्यामध्ये 668 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर 33 जणांचे मृत्यू झालेले आहेत. सध्या जिल्ह्यात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 281 एवढी आहे तर उपचारानंतर बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्याही 364 एवढी आहे.

11 जुलै रोजी 366 रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत आलेले होते. त्यापैकी 28 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले होते. 4 जणांचे अहवाल अनिर्णित आले तर 8 जणांचे अहवाल रद्द करण्यात आलेले होते. 63 जणांचे अहवाल प्रलंबीत होते. 28 मध्ये एका रुग्णाचा अहवाल पुर्नतपासणीत पॉझिटीव्ह आलेला होता. नवीन 27 रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले तर 10 जुलै रोजीच्या प्रलंबीत मधील 7 रुग्णही कोरोना संक्रमीत असल्याचे दिसून आले. तब्बल 34 ने जिल्ह्यातील रुग्णांची संख्याही वाढली.

कोरोना संक्रमित असलेल्यांमध्ये लातूर शहरातील भोई गल्ली येथील एक, अहमदपूर एक, साळे गल्ली एक, विक्रम नगर एक, अंबाजोगाई रोड एक, प्रकाश नगर एक, विक्रम नगर एक, राम गल्ली दोन, विर हनुमान वाडी लातूर एक, शिवाजीनगर निलंगा एक, भक्ती नगर एक, वाले नगर एक, खोरी गल्ली एक, जुना औसा रोड एक, औसा रोड एक, जी.एम.सी.रोड 2, झरी ता. चाकूर 2, वाले इंग्लिश स्वूâल जवळ एक, महादेव नगर लातूर 4, नरसिंह नगर एक, मिस्कीन पुरा लातूर 4, देशपांडे गल्ली लातूर एक, मोती नगर एक, एस.टी.कॉलनी उदगीर एक, दत्त नगर निलंगा एक यांचा समावेश आहे.

निलंगा तालूक्यातील मौजे औराद शहाजनी येथील 66 वर्षीय रुग्णाचा लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 33 वर पोहंचलेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या