लातूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 4696 वर, 160 बाधितांचा मृत्यू

1275

लातूर जिल्ह्यातील कोरोनाचे मिटर वेगात सुरू असून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 4696 झाली आहे. आज उपचारादरम्यान दोन रुग्णांचा येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रूग्णांची संख्या आता 160 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 2479 रुग्ण आजपर्यंत उपचाराने बरे झाले आहे.

लातूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जुलैपासून वेगाने वाढत आहे. वाढत जाणारी रुग्ण संख्या लक्षात घेतात प्रशासनाने 15 जुलैपासून संचार बंदीचा आदेश लागू केले होते. हे आदेश नंतर वाढवून 15 ऑगस्ट पर्यंत करण्यात आले. 16 ऑगस्टपासून संचारबंदी शिथिल होणार आहे, परंतु जिल्ह्यातील कोरनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

लय भारी! Zydus Cadila कंपनीनं कोरोनाचं देशातील स्वस्त औषध केलं लॉन्च, जाणून घ्या किंमत

12 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या स्वॅब आणि रॅपिड टेस्टमध्ये तब्बल 208 रुग्ण वाढले आहेत. लातूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या त्यामुळे 4 हजार 696 पोहोचली आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रूग्णांची संख्या 160 झाली असून सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2057 एवढी आहे. उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2479 एवढी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या