लातूरकरांना दिलासा! जिल्ह्यातील 59 रुग्ण ठणठणीत, घरी परतले

1981

बाहेरगावावरून येणाऱ्या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोणाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तीन रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र लातूरकरांना दिलासादायक बाब म्हणजे आजपर्यंत तब्बल 59 रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतलेले आहेत.

लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालेले आहेत. बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांमुळे ही संख्या वाढत आहे. जिल्ह्यात सर्वप्रथम निलंगा शहरात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेले होते. त्यानंतर कांही दिवस बरे गेले आणि जिल्ह्यात हळूहळू कोरोनाने आपले पाय पसरले. लातूर तालूका, रेणापूर तालूका, अहमदपूर तालूका, जळकोट तालूका, निलंगा तालूक्यातील गावांमधून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत गेली.

शहरासह जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, व्यापारी संस्थाने, आस्थापना सुरू करण्यात आलेल्या आहेत. बाजार समितीमध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू आहेत. त्यातच उन्हाची तीव्रता वाढलेली असल्याने दुपारच्यावेळी रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे. परंतु बाजारपेठेतील गर्दीमुळे भितीदायक चित्र वाटत आहे.

लातूरकरांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे आजपर्यंत तब्बल 59 रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेलेले आहेत. दि.27 रोजी 8 रुग्णांना उपचारानंतर सोडण्यात आले. त्यामध्ये निलंगा तालूक्यातील कोराळी येथील 6 जण, जळकोट तालूक्यातील गव्हाण येथील एक जण आणि उदगीर  येथील एका जणाचा समावेश होता. आजही एका रुग्णास सोडण्यात आलेले आहे. 29 मे रोजी 3 जणांना, 30 मे रोजी 13 जणांना 31 मे रोजी 4 जणांना, 1 जून रोजी 1, 5 जून रोजी 11 जणांना, 6 जून रोजी 12 जणांना सोडण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आलेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या