आदेश डावलून दुकाने सुरू ठेवणाऱ्यांविरोधात लातूरमध्ये गुन्हे दाखल

1935

लातूर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व आस्थापना, दुकाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतरही आपली दुकाने सुरू ठेवणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारायला सरुवात केली आहे. आदेश डावलून दुकाने सुरू ठेवणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

लातूर शहरातील नटराज सिनेमागृहाशेजारी जे.के.पान स्टॉल ही पानटपरी बंद करण्यात आली नाही. वसीम रहमतखान पठाण लोकांना तंबाखू, सुपारी यांची विक्री करत होता. संजय कांबळे यांच्या फिर्यादीवरुन वसीम पठाणविरोधात गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेणापूर तालूक्यातील मौजे बिटरगाव येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये अप्पा पान स्टॉल नावाची पानटपरी सुरु होती. लिंबराज पंडीत साखरे हा ती टपरी चालवत होता. त्याच्या टपरीमधून विक्रीचा माल जप्त करण्यात आला. तसेच त्याच्याविरोधात रेणापूर पोलीस ठाण्यात गौतम कांबळे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिटरगाव येथील शंकर पान स्टॉलही सुरु होते. लक्ष्मण बाळासाहेब काकडे ही पानटपरी चालवत होता. त्याच्याकडूनही विक्रीचे साहित्य जप्त करण्यात आले. त्याच्याविरोधातही रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेणापूर येथील वैभव ढाब्यासमोर पानटपरी सुरु होती. मिथून प्रकाश आडे ही टपरी चालवत होता. त्याच्या दुकानातील विक्रीचे साहित्य जप्त करून रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेणापूर येथील दत्त मार्केट परिसरातील अशिष पान स्टॉल सुरु ठेवण्यात आले होते. महादेव काशीनाथ वाडकर यांची ही पानटपरी आहे. त्याच्या दुकानातूनही विक्रीचे साहित्य जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या