लातूर जिल्ह्यामध्ये 2 रुग्ण वाढले, एकूण रुग्ण संख्या 79 वर पोहोचली

7460

लातूर जिल्ह्यामध्ये पुन्हा कोरोनाचे दोन रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 79 वर पोहोचली आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 22 मे 2020 रोजीचे एकुण 21 अहवाल प्रलंबित होते. उदगीर येथील 2 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते.

त्या दोन्ही व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत व निलंगा येथील 2 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्या दोन्ही व्यक्तींचे अहवाल अनिर्णित(Inconclusive) आले आहेत. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्ण 79 झाले असून सध्या उपचार घेत असलेले रुग्ण 41 आहेत तर उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण 36 आहेत. कोरोनामुळे जिल्ह्यातील दोघांचा मृत्यूही झालेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या