लातूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी दिलासा, एका दिवसात 23 रुग्ण बरे होऊन घरी परतले

994

लातूर जिल्ह्यात एकीकडे दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूची संख्याही वाढत असतानाच लातूरकरांसाठी एक दिलासादाय बातमी 6 जुलै रोजी ठरली आहे. तब्बल 23 रुग्ण उपचारानंत बरे होऊन घरी परतले आहेत. त्याचप्रमाणे 7 रोजी ही उपचारानंतर बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या ही 28 एवढी आहे. रिपोर्ट पाहूनच हे रुग्ण घरी सोडले जात आहेत.

लातूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या जिल्ह्यात 499 एवढी झालेली आहे. सुमारे 25 रुग्णांना आपला प्राणही गमवावा लागलेला आहे. यामध्येच 6 आणि 7 रोजी लातूरकरांना दिलासा देणारी बातमी म्हणजे 6 जुलै रोजी तब्बल 23 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतलेले आहेत. तर 7 रोजी ही 28 रुग्णांना घरी सोडण्यात येणार होते. परंतु पुन्हा त्याची तपासणी करुनच ते पूर्ण बरे झाल्याची खात्री करून घेऊनच त्यांना घरी पाठवले जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या