लातूर जिल्ह्यामध्ये कोरोना मीटर वेगात सुरू झाले आहे. मागील सहा दिवसांमध्ये तब्बल 110 रूग्ण वाढले असून 57 जणांचे अहवाल अनिर्णीत आले होते. दिनांक 30 रोजी तपासणीसाठी आलेल्या 189 स्वॅब पैकी 155 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून बारा जणांचे अहवाल अनिर्णीत आले आहेत.
लातूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आता चिंतेची बाब निर्माण होत आहे. मागील सहा दिवसांमध्ये जिल्ह्यात तब्बल 110 नवीन कोरोना रुग्ण वाढले आहेत तर अठ्ठावन्न जणांचे अहवाल अनिर्णीत आले होते.
संस्थेमध्ये 189 व्यक्तींचे स्वॅब
तपासणीसाठी आलेले होते, त्यापैकी 155 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून पुन्हा 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 12 जणांचे अहवाल अनिर्णीत आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या मध्ये उदगीर येथे एक, चाकूर तालुक्यातील दोन, लातूर महानगरपालिका क्षेत्रातून घेण्यात आलेल्या स्वॅब पैकी दहा तर विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेत घेण्यात आलेल्या स्वॅब मधील नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. लातूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 356 वर पोहोचली आहे. 17 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.



























































