लातूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3167 वर पोहोचली

1060

लातूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या संचारबंदीच्या काळातही बेफाम वाढत आहे.6 ऑगस्ट रोजी 169 पॉझिटिव्ह रुग्ण वाढले असून जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3167 वर पोहचली आहे. उपचारादरम्यान 15 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता 127 वर पोहचली आहे.

6 ऑगस्ट रोजी 164 स्वॅब तपासण्यात आले त्यामध्ये 41 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून 99 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 826 जणांचे रॅपिड अ‍ॅन्टीजिन टेस्ट करण्यात आले होते. त्यामध्ये 128 जण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये कोष्टगाव ता. रेणापूर 1, गरुड चौक लातूर 1, जयभिम नगर लातूर 1, कोल्हेनगर लातूर 1, व्यंकटेश नगर लातूर 1, लातूर 1, बाभळगाव ता. लातूर 2, शिरुर अनंतपाळ 11, उदगीर 1, दावणगाव ता. उदगीर 1, शेकापूर ता. उदगीर 1, आदर्श कॉलनी लातूर 1, वडमुरंबी ता. देवणी 3, हत्तेनगर लातूर 1, अशोक नगर उदगीर 1, शिवाजीनगर निलंगा 1, मथुरा नगर निलंगा 1, दापका ता. निलंगा 1, आनंदमुनी नगर निलंगा 1, देवणी 1, टाका ता. औसा 2, औराद ता. निलंगा 3, मजगे नगर लातूर 1, स्वराज नगर लातूर 1, मंठाळे नगर लातूर 1.

रॅपिड अ‍ॅन्टीजिन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये काळेगल्ली लातूर 1, मजगे नगर लातूर 1, वडवळ ता. चावूâर 1, बाभळगाव ता. लातूर 2, गौर ता. निलंगा 1, कोराळी ता. निलंगा 1, कासार सिरसी ता. निलंगा 6, प्रकाश नगर लातूर 1, बोरफळ ता. औसा 1, बोधे नगर लातूर 1, धोंडे नगर निलंगा 1, उमरदरा ता. निलंगा 1, नळेगाव ता. चाकूर 15, उजनी ता. औसा 2, किल्लारी 1, बार्शी रोड लातूर 2, इंडिया नगर लातूर 2, जुना रेणापूर नाका 1, लातूर 1, हाडगा रोड लातूर 1, सिध्देश्वर चौक लातूर 1, मोतीनगर लातूर 1, प्रकाश नगर लातूर 2, होळकर नगर लातूर 1, मंठाळे नगर लातूर 1, लक्ष्मी कॉलनी लातूर 1, हरंगुळ ता. लातूर 1, मोती नगर लातूर 1, प्रकाश नगर लातूर 1, लक्ष्मी कॉलनी लातूर 1, एमआयडीसी लातूर 2, सिध्देश्वर चौक लातूर 1, गंगाधाम लातूर 1, नाथनगर लातूर 2, जुना औसा रोड लातूर 1, महादेव कॉलनी लातूर 1, अहमदपूर 1, उजना ता. अहमदपूर 1, शिरुर ताजबंद ता. अहमदपूर 1, हाश्मी नगर लातूर 1, अंबाजोगाई रोड लातूर 1, सिंधू कॉम्प्लेक्स लातूर 3, साईचंद्र रेसिडन्सी लातूर 1, सेंट्रल हनुमान लातूर 1, सावेवाडी लातूर 2, चिल्लरगे गल्ली लातूर 1, शिवाजी कॉलेजजवळ उदगीर 1, संत कबीर नगर उदगीर 1, उदगीर 1, अहिल्यादेवी होळकर नगर लातूर 5, टाकळी ता. लातूर 1, आम्लेश्वर गल्ली लातूर 1, सुशीलादेवी देशमुख नगर लातूर 1, उमरगा बोरी ता. लातूर 3, विक्रम नगर लातूर 1, प्रकाश नगर लातूर 1, अहमदपूर 1, मांजरी ता. लातूर 1, विक्रम नगर लातूर 2, लेबर कॉलनी लातूर 1, वडवळ ता. लातूर 1, म्हाडा कॉलनी लातूर 2, एलआयसी कॉलनी लातूर 1, अक्षय कॉलनी लातूर 1, अहमदपूर 1, पशुपतीनाथ नगर 1, बोरुळ ता. देवणी 1, हिंद कॉलनी खोरेगल्ली लातूर 1, संत गोरोबा सोसायटी लातूर 1, पोहरेगाव ता. रेणापूर 1, कासारगाव ता. लातूर 1, बोरवटी 1, आर्वी साई रोड लातूर 1, बाभळगाव ता. लातूर 5, गव्हाण ता. रेणापूर 4, वडवळ ता. चावूâर 6, चाकूर 2, देवणी 1.

उपचारादरम्यान 15 रुग्णांचा मृत्यू
15 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात मृत्यू झालेल्यांमध्ये 60 वर्षीय पुरुष लेबर कॉलनी लातूर, 55 वर्षीय पुरुष शंकर पुरम नगर लातूर, 74 वर्षीय पुरुष निडेबन उदगीर, 65 वर्षीय स्त्री गवळी गल्ली लातूर, 85 वर्षाचा पुरुष सुभाष नगर लातूर, 60 वर्षीय स्त्री लेबर कॉलनी लातूर, 79 वर्षीय पुरुष चातरंगी गल्ली अहमदपूर, 70 वर्षीय स्त्री लेबर कॉलनी लातूर, 58 वर्षीय स्त्री लेबर कॉलनी लातूर, 47 वर्षीय स्त्री पाखरसांगवी लातूर, 60 वर्षाची स्त्री निलंगा, 70 वर्षीय स्त्री नाथनगर लातूर, 48 वर्षाचा पुरुष आनंदवाडी ता. निलंगा तर सामान्य रुग्णालय उदगीर येथे 60 वर्षाचा पुरुष कावडगाव ता. अहमदपूर व 62 वर्षीय पुरुष हनुमानकट्टा उदगीर यांचा मृत्यू झाला.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात 85 जणांचे मृत्यू झाले आहेत. सामान्य रुग्णालय उदगीर येथे 31 रुग्णांचे, अल्फा हॉस्पिटल लातूर येथे 7, शासकीय वसतीगृह नवीन इमारत देवणी, मुलांची शासकीय शाळा औसा व उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे प्रत्येकी एका रुग्णाचा तर आदित्य बिर्ला हॉस्पिटल चिंचवड येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या