लातूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच, जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3348

1150

लातूर जिल्ह्यात संचारबंदीच्या काळातही कोरोनाचा कहर सुरूच आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 3348 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून उपचारादरम्यान 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची एकूण संख्या 136 वर पोहचली आहे.

लातूर जिल्ह्यात 15 जुलै पासून कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे संचारबंदी लागू करण्यात आली. मध्यंतरी चार दिवस काही अंशी शिथीलताही देण्यात आली परंतु पुन्हा कडकडीत संचारबंदी सुरू झाली. मात्र त्याचा काहीच परिणाम झालेला नाही. कोरोनाचा कहर जिल्ह्यात सुरू झालेला आहे. 7 ऑगस्ट रोजी तब्बल 181 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे लातूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3348 वर पोहचली आहे. 8 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान 9 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 136 वर पोहचली आहे. 7 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये कोरेगाव ता. रेणापूर 1, गौर ता. निलंगा 1, मोतीनगर लातूर 1, बाजार चौक औसा 1, पटेल चौक माळेगल्ली लातूर 1, मित्र नगर लातूर 1, धनेगाव ता. लातूर 1, केळगाव ता. निलंगा 1, विठ्ठल नगर लातूर 1, मोतीनगर लातूर 1, हरंगुळ ता. लातूर 1, मजगे नगर लातूर 1, खोपेगाव ता. लातूर 1, हारेगाव ता. औसा 1, महसुल कॉलनी लातूर 1, जीएमसी रोड लातूर 1, टाकळगाव उदगीर 1, खडकाळी गल्ली उदगीर 1, हनुमान रोड उदगीर 1, मलकापूर ता. उदगीर 1, विकासनगर उदगीर 1, लातूर 1, अंबुलगा ता. निलंगा 1, पद्मावती गल्ली लातूर 1, खंडोबा गल्ली लातूर 1, बंडगर गल्ली लातूर 1.

दि. 7 ऑगस्ट रोजी रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये हसाळा ता. औसा 2, कन्हेरी ता. औसा 1, आनंदनगर लातूर 1, बोरगाव ता. लातूर 1, गिरवलकर नगर लातूर 1, अहमदपूर 6, कासार सिरसी 3, मुरुड ता. लातूर 2, नळेगाव ता. चाकूर 7, वडवळ ता. चाकूर 2, किल्लारी ता. औसा 6, हाडगा नाका ता. निलंगा 1, औराद ता. निलंगा 1, टाके नगर लातूर 1, लातूर 1, बाभळगाव रोड लातूर 1, बोरी उमरगा ता. लातूर 4, दिपज्योती नगर लातूर 1, प्रकाश नगर लातूर 4, बार्शी रोड लातूर 2, जुना औसा रोड लातूर 1, सावेवाडी लातूर 1, मोतीनगर लातूर 3, श्रीकृष्ण नगर लातूर 3, म्हाडा कॉलनी लातूर 1, आंबेडकर चौक लातूर 1, देवणी 2, तिवटघाळ ता. उदगीर 1, आंबेडकर सोसायटी उदगीर 2, हाळी ता. उदगीर 1, उदगीर 1, हिप्परगा ता. उदगीर 1, अशोक नगर लातूर 1, यशवंत सोसायटी उदगीर 1, भागीरथी नगर उदगीर 4, सरस्वती कॉलनी उदगीर 1, नळगीर ता. उदगीर 2, बिदर रोड दत्तनगर उदगीर 2, कुमठा ता. उदगीर 1, बाभळगाव ता. लातूर 7, होळी ता. औसा 5, मंठाळे नगर लातूर 4, लेबर कॉलनी लातूर 2, देशपांडे गल्ली लातूर 1, विशाल नगर लातूर 1, रेणापूर नाका लातूर 1, विवेकानंद चौक लातूर 1, भुई गल्ली लातूर 3, पंचवटी नगर लातूर 2, सिध्देश्वर नगर लातूर 1, सिध्देश्वर चौक लातूर 1, सिग्नल कॅम्प लातूर 1, अक्षय नगर लातूर 1, अंजली नगर लातूर 1, मोतीनगर लातूर 3, विलासनगर लातूर 1, मंत्री नगर लातूर 1, हत्तेनगर लातूर 1, मेडीकल कॉलनी लातूर 1, लेबर कॉलनी लातूर 1, गौतम नगर लातूर 1, पालेगल्ली लातूर 1, खंडोबा गल्ली लातूर 1, केशवनगर लातूर 1, संभाजीनगर लातूर 1, कस्तुरे गल्ली पानगाव ता. रेणापूर 1, लोंबीणी नगर लातूर 1, समर्थ चौक लातूर 1, शिवाजी चौक लातूर 1, सुतमिल रोड लातूर 1, गंगापूर ता. लातूर 1, इंडिया नगर लातूर 1, गव्हाण ता. रेणापूर 1, नळेगाव ता. चाकूर 1, वडवळ ता. चाकूर 1, घारोळा ता. चाकूर 1, बीएसएफ चाकूर 1, चाकूर 1, चापोली ता. चाकूर 3, अलगरवाडी ता. चाकूर 1, वडवळ ता. चाकूर 1, कव्हा ता. लातूर 1, चिंचोली ब. ता. लातूर 1, निटूर ता. निलंगा 3, जळकोट 1, साकोळ ता. शिरुर अनंतपाळ 3, दवणहिप्परगा ता. देवणी 1, वलांडी ता. देवणी 4.

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांमध्ये 60 वर्षीय पुरुष पाटील नगर चाकूर यांचा कृषी पीजी कॉलेज चाकूर येथे मृत्यू झाला. 67 वर्षीय स्त्री सराफा लाईन रोड उदगीर, 35 वर्षीय स्त्री नळेगाव ता. चाकूर यांचा सामान्य रुग्णालय उदगीर येथे मृत्यू, 70 वर्षीय पुरुष नारायण गल्ली शिरुर अनंतपाळ आणि 60 वर्षीय पुरुष अहमदपूर, 32 वर्षीय पुरुष भिंगोली ता. शिरुर अनंतपाळ, 60 वर्षीय पुरुष रेणापूर, 65 वर्षीय स्त्री अहमदपूर, 41 वर्षीय पुरुष अलीम नगर उदगीर यांचा लातूरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या