लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2833 वर पोहचली

1153

लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ४ ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २८३३ वर पोहचली आहे. १११ रुग्णांचे आजपर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झाले असून १६३१ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.

लातूर जिल्ह्यात ४ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या २२० स्वॅबचा अहवाल ५ ऑगस्ट रोजी रात्री प्राप्त झाला. त्यामध्ये १४० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ४५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. १९ जणांचे अहवाल पुनर्तपासणी तर १६ जणांचे अहवाल रद्द करण्यात आले. रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्टमध्ये तब्बल ९३ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये चौधरी नगर लातूर १, साठे नगर अहमदपूर १, प्रकाश नगर लातूर २, मळवटी रोड लातूर १, हरंगुळ ता. लातूर २, नारायण गल्ली शिरुर अनंतपाळ १, कासार सिरसी ता. निलंगा १, हत्ते नगर लातूर १, उदगीर १, शाहुपुरी कॉलनी लातूर १, घरणी ता. चावूâर, सिध्दार्थ सोसायटी लातूर १, लेबर कॉलनी लातूर १, उजनी ता. औसा १, जगदंबा चौक शिरुर अनंतपाळ १, पिंपरी आंबा लातूर १, बोडका ता. अहमदपूर १, सोरा ता. अहमदपूर १, बोरी उमरगा ता. लातूर १, जीएमसी रोड लातूर १, हनुमान टेकडी लातूर १, एलआयसी कॉलनी लातूर १, पानगाव ता. रेणापूर १, अंबाजोगाई रोड अहमदपूर १, सोनवती ता. लातूर १, औसा ७, बिदर रोड उदगीर १, व्यंकटेश नगर उदगीर १, चिल्लरगे गल्ली उदगीर १, देवणी ३, पानगाव ता. रेणापूर १, शिवाजीनगर निलंगा १.दि. ४ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये वडवळ ता. चाकूर १, साई रोड लातूर १, लक्ष्मी कॉलनी लातूर २, बार्शी रोड लातूर १, नाथ नगर लातूर ५, इंडिया नगर लातूर १, शिवाजी चौक लातूर १, आयोध्या कॉलनी लातूर १, बोधे नगर लातूर ३, नेताजी नगर लातूर १, श्याम नगर लातूर १, नळेगाव २, सिंदखेड ता. निलंगा १, सिध्देश्वर नगर लातूर ३, बँक कॉलनी औसा १, नाथ नगर औसा ३, देवणी २, शाहु कॉलनी उदगीर ५, नळेगाव ता. चावूâर २, शेकापूर ता. उदगीर २, बीएसएफ वॅâम्प चाकूर २, चापोली ता. चाकूर १, होळकर नगर लातूर १, कोराळी ता. निलंगा २, कासार सिरसी ता. निलंगा १, नेलवाड ता. निलंगा १, अशोक नगर उदगीर १, अंबुलगा ता. निलंगा ४, खंडोबा गल्ली लातूर १, हासुरी ता. निलंगा १, कुलस्वामिनी नगर लातूर ६, प्रकाश नगर लातूर ४, सिध्देश्वर चौक लातूर १, साळे गल्ली विर हनुमान रोड लातूर २, बार्शी रोड लातूर १, गांधी चौक लातूर १, रत्नापूर चौक लातूर ३, जुना औसा रोड लातूर १, भोई गल्ली लातूर १, गंजगोलाई लातूर १, स्वप्नपूर्ती नगर लातूर १, अहमदपूर १, सिंधी ता. अहमदपूर १, शिक्षक कॉलनी अहमदपूर ३, एमजे कॉलेज रोड अहमदपूर १, कन्हेरी चौक लातूर १, आर्वी ता. लातूर २, धनेगाव ता. लातूर २, बोरी ता. लातूर ३, मुरुड १, लांबोटा ता. निलंगा २ यांचा समावेश आहे.

लातूर जिल्ह्यात १५८०६ जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले. त्यातील २२४१ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले तर आजपर्यंत ३९८५ रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या त्यात ९२ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत १११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था येथील ७२ रुग्णांचा, सामान्य रुग्णालय उदगीर येथील २८ रुग्णांचा, अल्फा हॉस्पिटल लातूर येथील ७ रुग्णांचा, शासकीय वसतीगृह नवीन इमारत देवणी १, मुलांची शासकीय शाळा औसा १, उपजिल्हा रुग्णालय निलंगा १ तर पुणे येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला. ७० वर्षाच्या वरील ४६ रुग्णांचे मृत्यू झाले असून ६० वर्षावरील ३८ रुग्णांचे, ५० वर्षावरील १५ रुग्णांचे, ५० वर्षाखालील १२ रुग्णांचे आजपर्यंत मृत्यू झाले आहेत.

१३३ रुग्ण उपचाराने बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. त्यामध्ये १०००मुला-मुलींचे वसतीगृह बारा नं. पाटी येथील ९६, मुलांची शासकीय निवासी शाळा मरशिवाणी ता. अहमदपूर येथील ६, सामान्य रुग्णालय उदगीर येथील ८, मुलांचे शासकीय निवासी शाळा औसा येथील ११, उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथील ३, कोविड केअर सेंटर दापका ता. निलंगा येथील ४, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर येथील ५ यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या