लातूर जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी सरासरी 75 टक्के मतदान

जिल्ह्यात दुपारी साडेतीन पर्यंत ६७ .०४ टक्के ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुकीसााठी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. ६५. ४३ टक्के पुरुष मतदारांनी तर ६९.०१ टक्के महिला मतदारांनी मतदान केले होते.

सहा लाख ३९ हजार २६ मतदारांपैकी चार लाख २८ हजार ४२५ मतदारांनी मतदान केले असून संपेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ७५ टक्के पेक्षा अधिक मतदान होईल असे सांगितले जात आहे. लातूर जिल्ह्यात सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी ७५ टक्के मतदान झाले होते.

जिल्ह्यातील ४०८ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीमध्ये ६६८८ उमेदवार आपले भविष्य आजमावत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या २२३९ उमेदवारांनी आपले अर्ज परत घेतलेले आहेत. जिल्ह्यातील २५ ग्रामपंचायती बिनविरोध निघालेल्या असून २०२ सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत.

लातूर तालुक्यातील २१९ बुथवर एक लाख १८ हजार ९७१ मतदारांपैकी ३९ हजार ३५४ पुरुष मतदार तर ३६ हजार ९९ महिला मतदार असे एकूण ७५ हजार ४५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. लातूर तालुक्यातील ६३.४२ टक्के मतदान दुपारी साडेतीन पर्यंत झाले होते. औसा तालुक्यातील १६ बुथवर ८५ हजार ५४३ मतदारांपैकी तीस हजार ५३८ पुरुष तर २७ हजार ९४५ महिलांनी असे एकूण ५८ हजार ४८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, मतदानाची टक्केवारी ६८. ३७ टक्के झाली होती.

रेणापूर तालुक्यातील ८८ बुधवर ३५ हजार ५९७ मतदारांपैकी तेरा हजार ७७८ पुरुष मतदारांनी तर १२७४९ महिला मतदारांनी असे एकूण २६ हजार ५२७ जणांनी मतदान केले होते. तालुक्यातील मतदानाची टक्केवारी ७४.५२ एवढे राहिली. उदगीर तालुक्यातील २२० बुथवर ९८ हजार ९१२ मतदारांपैकी ३० हजार ८५१ पुरुष मतदारांनी तर ३२ हजार ४८२ महिला मतदारांनी असे एकूण ६६ हजार ३३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तालुक्याची टक्केवारी ६७.०६ टक्के झालेली होती.

अहमदपूर तालुक्यातील १३५ बुथवर ५२ हजार ९८ मतदारांपैकी १८ हजार ६१७ पुरुष तर ७० हजार ९५२ महिला मतदार असे एकूण ३६ हजार ५६९ मतदारांनी मतदानाचाा हक्क बजावला होता. तालुक्याची टक्केवारी ७०.१९ एवढी राहिली. चाकूर तालुक्यातील ८९ वर ४७ हजार ३४५ मतदारांपैकी सोळा हजार ४७० पुरुष मतदारांनी तर १४ ८९५ महिला असे एकूण ३१ हजार ३१२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तालुक्यातील मतदानाची टक्केवारी ६६.१४ टक्के राहिली. जळकोट तालुक्यातील ७८ बुथवर ३१ हजार ३९६ मतदारांपैकी १० हजार ४७४ पुरुष तर १० हजार ४६५ महिला मतदार असे एकूण २०९३९ जणांनी मतदान केले होते. तालुक्यातील मतदानाची टक्केवारी ६६.६९ एवढी होती.

निलंगा तालुक्यातील १६९ बुथवर ८६६०२ मतदारांपैकी २९५६७ पुरुष. २७२९२ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ६५.६६ टक्के मतदान झालेले होते. देवणी तालुक्यातील १०५ बुथवर ४४ हजार ५८५ मतदारांपैकी १५ हजार ११९ पुरुष तर १४ हजार ९१५ महिला मतदार असे एकूण ३० हजार ३४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यातील मतदानाची टक्केवारी ६७.५३६ अशी होती. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ८६ बुथवर ३७ हजार ९७७ मतदारांपैकी १३००० ४९३ पुरुष तर १२४२३ महिला असे एकूण २५ हजार ९१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तालुक्यातील मतदानाची टक्केवारी ६८.२४ टक्के झालेली होती.

लातूर जिल्ह्यात दुपारी साडे तीन पर्यंत २ लाख २१ हजार २०८ पुरुष मतदारांनी तर २ लाख ७ हजार २१७ महिला मतदारांनी असे एकूण ४ लाख २८ हजार ४२५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. लातूर जिल्ह्यात सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी ७५ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. लातूर तालुक्यात ६३.४२ टक्के, औसा तालुक्यात ८९.३९ टक्के, रेणापूर तालुका ८३.५२ टक्के, उदगीर तालुका ८०.७४ टक्के, अहमदपूर तालुका ७९.७५ टक्के, चावूâर तालुका ७५.६१ टक्के, जळकोट तालुका ८०.७२ टक्के, निलंगा तालुका ७५.७९ टक्के, शिरुर अनंतपाळ ६८.२९ टक्के तर देवणी तालुका ७० टक्के मतदान झाले.

जळकोट – जळकोट तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या ७८ प्रभागांतून घेण्यात आलेल्या निवडणुकीत तालुक्यात दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६६.६९ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून प्राप्त झाली आहे. मतदार यादीनुसार २६ ग्रामपंचायतींमध्ये पुरुष १६६४८ तर स्त्री १४७४८ अशी एकूण ३१३९६ एवढी मतदार संख्या आहे. त्यापैकी एक सकाळी ७.३० ते ३.३० वाजेपर्यंत ६६.६९ टक्के मतदान झाले आहे. १०४७४ पुरुष व १०४६५ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान करण्यामध्ये स्त्रिया आघाडीवर असून त्यांची टक्केवारी ७०.४५ टक्के तर पुरुष टक्केवारी ६२.९१ टक्के आहे.

वांजरवाडा – जळकोट तालुक्यातील वांजरवाडा मध्ये ७.३०.ते सायंकाळी ५.३०  मतदान ८० टक्के झाले.
नळेगाव – आज २०२१ ग्रामपंचायत निवडणूक मतदान पूर्णपणे शांततेत पार पडले येथील मतदान संख्या १११७५ असून प्रभाग सहा आहेत. एकूण १११७५ मतदारांपैकी ८३००मतदारांनी आपला हक्क बजावला. एकूण ७४.२७ टक्के मतदान झाले.

आपली प्रतिक्रिया द्या