लातूर जिल्ह्यात कोरोचे 13 नवीन रुग्ण वाढले, रुग्णांची संख्या 118 वर पोहोचली

2841
corona-new

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत 27मे रोजी लातूर जिल्ह्यातील 106 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील 89 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून चार जणांचे अहवाल इनकनक्ल्युजिव्ह आले आहेत.

लातुरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्ये आज 27 मे रोजी लातूर जिल्ह्यातील 106 जणांचे स्वँब तपासणीसाठी आलेले होते. त्यामध्ये चाकूर येथील एक रेणापूर येथील 10 उदगीर येथील 39 तर कासारशिरसी येथील 23 आणि विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्ये देण्यात आलेले 33 यांचा समावेश होता.

चाकूर तालुक्यातील 1 रेणापूर तालुक्यातील 10 आणि कासार शिरशी येथील 23 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उदगीर येथील 23 तर लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत घेतलेले 32 अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.13 मे रोजी पुणे येथून प्रवास करून आलेला असून नांदेड रोड, लातूर येथे वास्तव्यास आहे व तो मूळचा भातांगळी येथील रहिवासी आहे. सद्यस्थितीत तो ऑक्सिजन वर असून त्याची प्रकृती स्थिर आहे. उदगीर येथील 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर चार जणांचे अहवाल इनकनक्ल्युजिव्ह आलेली आहेत.

अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली आहे.

लातूर जिल्हातील कोरोना रुग्णसंख्या यामुळे 118 वर पोहोचली आहे. लातूर जिल्ह्यात सध्याउपचार घेत असलेले रुग्ण 58 आहेत. तर उपचाराने बरे झालेले रुग्ण 58 आहेत, मृत्यू झालेले रुग्ण 3 एवढी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या