किल्लारी येथे महामार्गावर दोन मोटारसायकल अपघातात दोन जण ठार

उमरगा-लातूर महामार्गावर दोन मोटरसायकलची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले आहेत. मंगळवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास हा अपघात घडला.

किल्लारी येथून समाधान राम कांबळे (वय 26 रा.कवठा ता.उमरगा) हा मोटरसायकलवरून कवठा येथे जात होता. त्याच्या पुढे एक एसटी बस जात होती. त्या बसला ओव्हरटेक करुन जात आसताना समोरच्या मार्गाने विरुद्ध दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीला त्याने ठोकले. ही धडक एवढी भीषण होती की दोन्ही बाईकवरील तरुणांचा मृत्यू झाला. निलेश मदन पाटील असे त्या दुसऱ्या बाईकवरील तरुणाचे नाव आहे.

अपघातानंतर दोघांनाही किल्लारी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्य़ात आले होते. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. घोडके यांनी दोघांनाही मृत घोषीत केले. किल्लारी पोलीस स्टेशनला डॉक्टर एम.के.आनीगुंठे यांनी दिलेल्या माहितीनुसार आक्समिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. पुढील तपास बिट जमादार गौतम भोळे व आबा इंगळे करीत आहेत

आपली प्रतिक्रिया द्या