लातूर – टाटा सफारीचे बक्षीस लागल्याचे सांगून एक लाख 97 हजारांची फसवणूक

स्नॅपडील मार्फत टाटा सफारीचे बक्षीस लागले आहे असे सांगून तब्बल एक लाख 97 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुध्द देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात देवणी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत पुष्कराज शेषेराव शिंदे रा.हेळंब ता.देवणी यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की स्नॅपडील मार्फत त्यांना टाटा सफारी बक्षीस मिळत आहे असे सांगून गाडी किंवा गाडीची किंमत मिळवण्यासाठी तुम्हाला चार्जेस भरावे लागतील असे संतोष अग्रवाल आणि अलोककुमार सिंग यांनी सांगीतले. त्यांनी सांगितलेल्या बँक खात्यामध्ये फिर्यादीने तब्बल एक लाख 97 हजार रुपये भरले. परंतू नंतर पुन्हा 74800 रुपयांची मागणी करण्यात आली. ही रक्कम भरण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी धमकी व त्रासदायक फोन करण्यास सुरुवात केली. फसवणूक केल्याप्रकरणी देवणी पोलीसांनी दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या