Latur News डीजे मुक्त लातूर ही संकल्पना लातूरात राबवावी, पत्रकार परिषदेत मागणी

मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात डीजे, डॉल्बी लावल्या जात आहेत. पोलिसांनी परवानगी देऊ नये अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत अभिजित देशमुख यांनी सांगितले.

लातूर पासून सुरुवात व्हावी यासाठी पुढाकार घेतला आहे. जागरुकता निर्माण व्हावी म्हणून सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. चौकात स्टेज असू नयेत. राजकीय दबावापोटी प्रशासन काम करतेय, असा आरोप देखील त्यांनी केला.

आवाजामुळे बहिरेपणा येण्याचे प्रमाण वाढत आहेत. डीजे, डॉल्बी आणि कानातील हेडफोन मुळेही हे प्रमाण वाढत आहे. मागील चार वर्षांपासून हे रुग्ण वाढत चालले आहे. आपला कान 80 डेसिबल पर्यंत चा आवाज सहन करू शकतात. त्या पुढील आवाज कान सहन करू शकत नाहीत, असे डॉ. आनंद गोरे यांनी यावेळी सांगितले.

संतोष तुपडीकर यांनी सांगितले की, लेजर लाईटमुळे सध्या अनेकांना ञास होतो आहे. लेजरचा वापर हा नष्ट करण्यासाठी केला जातो पण सध्या लाईट सोबत लेजरचा वापर होत आहे. त्यामुळे अनेकांना कायमचा दृष्टी दोष होत आहे. डॉ. रमेश भराटे यांनी सांगितले की, डीजे, डॉल्बी मुळे हृदयावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. हृदय विकाराचा झटका येतो. हृदयाची गती वाढते त्यामुळे यावर निर्बंध घालण्यात आले पाहिजेत. यावेळी अभिजित पाटील, आनंद गोरे, प्रविण सुर्यवंशी, शाम जाधव, उमेश गुंठावार यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.