लातूर- चोरट्यांनी केली घरफोडी, 7 लाखांचा ऐवज लंपास

लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील आशीव येथे अज्ञात चोरट्यांनी घर फोडले. तब्बल 7 लाख 40 हजार रुपयांचे सोन्याचे दागीने आणि रोख 900 रुपये पळवण्यात आले असून या प्रकरणी भादा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील चोरी प्रकरणी अजय बाबुराव जगताप रा.आशीव यांनी भादा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय 25 ऑक्टोबर रोजी रात्री घराच्या दुसऱ्या मजल्यावर झोपले होते.

अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटातील सोन्या चांदीचे दागीने किंमत 7 लाख 40 हजार रुपये आणि रोख 900 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. सकाळी उठल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणी चोरीची तक्रार दाखल करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती हे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या