
लातूर शहर,लातूर एमआयडीसी आणि आजूबाजूच्या गावांना पाणीपुरवठा होणाऱ्या मांजरा धरणात केवळ 5.25 एम एल डी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे लातूर एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिला होता. लातूर एमआयीसीतील उद्योजकांनी पाणी बंद न करता पाणी कपात करण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी तूर्तास पाणी कपात करण्यास सांगितले आहे. ऑक्टोबर महिन्यातपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यास एमआयडीसीचा पाणीपुरवठा एक ऑक्टोबरपासून बंद करण्यात येईल अशी भीती वर्तवण्यात येत आहे.
लातूर शहराला आता 15 दिवसाला पाणी दिले जात आहे. सध्याचा धरणातील पाणीसाठा पहात हे पाणी केवळ 2 महिने पुरेल, नंतर लातूरला टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. गरज भासल्यास शहरात पुन्हा रेल्वेने पाणी आणण्याची तयारी प्रशासनाने केली आहे


























































